Friday, 12 October 2012

स्पर्श


स्पर्श मैत्रीचे धागे घट्ट  करतो ... काल मीना प्रभूंचं  'गाथा  इराणी' हे पुस्तक वाचताना या वाक्याने मला पुस्तक बंद करून शांतपणे विचार करायला भाग पाडलं ... स्पर्श किती महत्वाचा असतो ना ! नातं कोणतंही  असू दे.. स्पर्श ते नातं घट्ट करतो.. आई , बाबा,  भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण , सहकारी , प्रियकर, प्रेयसी, अगदी आपला लाडका कुत्रा, मांजर...सगळ्या नात्यांमधली ऊब या स्पर्शातून वाहते..
स्पर्श ही  एक भाषा आहे  संवादाची.. त्याला शब्दांची गरज नाही.. शिक्षणाची सुद्धा नाही.. ती प्राणिमात्रांत उपजत आहे..ती वैश्विक आहे...
  

No comments:

Post a Comment